राणादाने सुरू केला हा भन्नाट बिझनेस, व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना दिले आमंत्रण

कोल्हापुर | मराठी मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीला प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी म्हणून ओळखले जाते. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. काहि दिवसांपुर्वीच या मालिकेने निरोप घेतला आहे.

मालिकेने निरोप घेतल्यानंतर राणादा उर्फ अभिनेता हार्दिक जोशी याने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत नवीन व्यवसाय सूरू केला असल्याची माहिती दिली आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन दिलं आहे.

हार्दिक जोशीने कॅप्शन दिलं आहे की, ‘आजवर तुम्ही माझ्यावर खुप प्रेम केलं आहे. आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला पाठिंबा कायम माझ्यासोबत राहील हा मला विश्वास आहे’.

‘कोल्हापुर बदाम थंडाई, दिनांक २५ फेब्रूवारीपासून म्हणजे आजपासून आपल्या सेवेत…मगं काय येणार नव्हं? यायला लागतंय… चालतंय की… या सायंकाळी ४ नंतर, खाऊ गल्ली खासबाग गल्ली कोल्हापुर’ असं हार्दिक जोशीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते.

महत्वाच्या बातम्या-
सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको
सरपंच निवडीनंतरच्या मिरवणुकीत पैशांची उधळण, पैसे घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे संतोष आनंद दुखावले; म्हणाले, भीक नाही भाकरी…
‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ७ मार्चला होणार मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.