पाठक बाईंचा राणा दा मध्ये जीव रंगला, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नक्की मॅटर काय आहे?

मुंबई | मराठी मालिकेत राणादा आणि पाठकबाई या जोडीला प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी म्हणून ओळखले जाते. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. यावेळी तुमच्या लाडक्या राणादा आणि पाठकबाईंनी दोघांचा सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

अलिकडे अनेक कलाकार इन्स्टाग्राम रिलवर व्हिडीओ पोस्ट करत आहेत. असाच एक व्हिडीओ पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर हिने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत राणादा म्हणजे हार्दिक जोशीही पाहायला मिळत आहे.

राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीची चर्चा आता सोशल मीडियावरही चांगलीच रंगली आहे. अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी दोघांच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अक्षयाने या व्हिडीओला “नौटंकी” असं कॅप्शन दिले आहे.

राणादा म्हणजेच हार्दिकच्या दाडीवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तर अक्षया पारंपारिक लूकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओत दोघांना असं एकत्र पाहून चाहत्यांना त्याच्या नात्याबद्दल प्रश्न पडला आहे. मालिका संपल्यानंतर खूप दिवसांनी दोघांना सोबत पाहून त्यांच्या बद्दलची नवी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का
गोविंदामूळे अमिताभ बच्चनच्या करिअरचा दुसरा पडाव सुरु झाला; वाचा पुर्ण किस्सा
….म्हणून निर्मात्यांनी घेतला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका बंद करण्याचा निर्णय
आश्चर्यकारक! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली शार्क, पोटातून बाहेर आली माणसाच्या चेहऱ्यांची मुलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.