तुझ्यात जीव रंगला! साहेबरावच्या आठवणीने राणादा झाला भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला…

मुंबई | मराठी मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीला प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी म्हणून ओळखले जाते. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. काही दिवसांपुर्वीच या मालिकेने निरोप घेतला आहे.

मालिकेत काम करत असताना राणादाची आणि साहेबराव या बैलाची चांगलीच जोडी जमली होती. मालिकेने निरोप घेतल्यानंतर राणादा उर्फ अभिनेता हार्दिक जोशी याने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत साहेबरावावर त्याचे किती प्रेम होते हे दाखवून दिले आहे. राणादा साहेबरावच्या आठवणीत भावूक झाला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

राणादा म्हणतो, तुझात जीव रंगला या मालिकेने मला जेवढी प्रसिद्धी, आणि यश दिलं, त्याचबरोबर साहेबराव सारखा निरागस, प्रेमळ मित्र दिला. मालिका संपली की हळूहळू प्रेक्षक राणाला कदाचित विसरतीलही. परंतु, तुमचा राणा त्याच्या लाडक्या साहेबरावला आजन्म विसरणार नाही. जेव्हा जेव्हा पावलं त्या वाटेकडे वळतील, तेव्हा काही क्षण वाट चुकवून माझ्या साहेबरावला मी नक्की भेटायला जाईन.

त्याला मस्त पाटावर नेऊन अंघोळ घालीन, त्याला भरपूर चारा खाऊ घालीन, त्याच्या तोंडावरून मायेनं हात फिरवीन, आणि त्याला मिठी मारून गोंजारीन. आणि मनातलं सगळं त्याच्याशी भडाभडा बोलीन. मला खात्री आहे, तेव्हा देखील माझा साहेबराव आनंदाने गुबुगुबु मान डोलावत माझं सगळं बोलणं ऐकून घेईन.

तसेच राणादा पुढे म्हणाला की, मुक्या प्राण्यांच्या प्रेमाला तोड नाही. साहेबराव मला तुझी खूप जास्त आठवण येतेय. तू या वेड्या राणाला सांभाळून घेतलंस, त्याला निस्वार्थ प्रेम दिलंस, त्यासाठी खरंच तुझे आभार. मी लवकरच तुला भेटायला येईन. काळजी घे, “साहेबराव”….पठ्ठ्या तुझ्यात जीव रंगला.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी पसंद केले होते. मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. यामध्ये साहेबराव नावाच्या बैलाची आणि राणादाची मैत्री दाखवली होती. राणादाचं मुक्या प्राण्यावरील असलेलं प्रेम दाखवण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या गाडीला अचानक मालवाहतूक गाडी येऊन धडकली अन्…
जाणून घ्या ‘अँखियों के झरोखों से’ गाण्यातील अभिनेत्री आज काय करते ?
जेठालालच्या मुलीला पाहून चाहते झाले पागल; सुंदरतेमध्ये देते बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर
टेलिव्हिजनवरील संस्कारी सुन निया शर्माने बिकनी घालून प्रेक्षकांना केले वेडे; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.