राणा दाम्पत्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यात तथ्य दिसत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळली आहे.(Rana couple slapped by High Court!)
राजकीय व्यक्तींनी दुसऱ्या व्यक्तींचा मान ठेऊन बोलायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी कायद्याचा आदर राखायला हवा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना सुनावले आहे. राणा दाम्पत्याने पोलिसांना विरोध करणं हे गैर आहे, असे देखील उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले आहे. यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी गुन्हे रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली.
यामध्ये गुन्हे रद्द करण्याची मागणी अमान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. यावरून दोन गटांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील खार पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
यावेळी नवनीत राणा यांनी पत्रामध्ये राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “मी संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यात काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले. पण मला रात्रभर पाणी दिले गेले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क देखील नाकारण्यात आला”, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
…तर राणा दाम्पत्याला तीन वर्षे जेलची हवा खावी लागणार? पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम
राणा दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाचा दणका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली
‘CID’ फेम दयानंद शेट्टी ‘या’ चित्रपटात झळकणार; विनोदवीर विशाखा सुभेदारसोबत करणार काम