आईला बेड मिळवून देण्यासाठी तो रात्रभर धावला, पण अखेर डोळ्यासमोरच कोरोनाने घेतले आईचे प्राण

 

राज्यात कोरोनाच्या संकटाने पुन्हा थैमान घातले आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण मिळत आहे. अशात अनेकांना उपचार मिळत नाहीये, त्यामुळे रुग्ण आपले प्राण गमावत असल्याच्याही घटना घडत आहे.

अशीच एक घटना आता रामवाडी गावात घडली आहे. एक मुलगा रात्रभर आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी फिरत होता, पण त्याला कुठेच बेड उपलब्ध झाला नाही. अशात आईने गाडीतच प्राण सोडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे.

रामवाडी गावात राहणाऱ्या  या महिलेचे नाव अरुलमेरी अँथनी असे आहे. त्यांचे वय ७३ होते. अरुलमेरी यांना गुरुवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा मुलगा आरकीदास हा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होता.

आईला कोरोना झाला असल्यामुळे त्याने आईला गाडीत बसवून गुरुवारी रात्री आठ वाजता संत ज्ञानेश्वर वस्तीगृहातील कोरोना सेंटरजवळ नेले. तिथे असे कळले की रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे, त्यामुळे आरकीदास आईला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण असूनमध्ये ऑक्सिजनचा बेड शिल्लक नव्हता.

त्यामुळे आरकीदास आपल्या आईला घेऊन जम्बो कोविड रुग्णालयात गेले. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना हेल्पलाईनवर माहिती देण्यास सांगितली. पण हेल्पलाईन नंबर दिडतास व्यस्त होता, दीड तासांनंतर समुपदेशकाने माहिती घेतली आणि पाच मिनिटांत कळवतो असे सांगितले. इकडे अरुलमेरी यांनी प्राण सोडले पण हेल्पलाईनवरून काहीही माहिती आली नाही.

डॅशबोर्डवर बेड उपलब्ध होते, असे दाखवत होते, पण रुग्णालयात जाताच बेड उपलब्ध नसल्याचे कळते. हेल्पलाईन नंबर सुध्दा व्यस्त येत होता, आईला पोर्टेबल ऑक्सिजन बॉटलने पुरवठा केला पण सकाळी ऑक्सिजनची मात्रा खूपच कमी झाली होती, त्यामुळे आईने गाडीतच प्राण गमावले, असे आरकीदास यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अरुलमेरी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मिळवण्यासाठी पण त्यांना खूप वाट पाहावी लागली. सकाळी साडे आठ वाजता वारलेल्या आईचा मृतदेह आरकीदास यांना संध्याकाळी सहा वाजता मिळाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.