निवडणूक लढायची असेल तर कमीत कमी १० झाडं लावा, नाहीतर निवडणूक लढता येणार नाही

आगामी काळात जर निवडणूक लढायची असेल, तर तुम्ही तुमच्या मतदार संघात १० झाडांची लागवड करणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला निवडणूकीसाठी अर्जच भरता येणार नाही. याबाबतची शिफारस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला केली आहे.

सध्या वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. त्यामुळे वातावरणातील बदल व ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपुर्वक बैठक पार पडली आहे.

या बैठकीमध्ये अशा प्रकारची एक शिफारस करण्यात आलेली आहे. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, आमदार विनायक मेटे उपस्थित होते.

या पुढील निवडणूकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने आपल्या मतदारसंघात किमान १० झाडांची लागवड करणे आवश्यक असेल अशी अट टाकण्यात यावी. तसेच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी आमदार निधीतून ठराविक प्रमाणात रक्कम खर्च करण्यास अनुमती देण्यात यावी, अशा शिफारसी रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या आहे.

मागील काही दिवसांपासून आपण बघितलं असेल, तर नैसर्गिक आपत्ती येण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राने महापुराचे संकट अनुभवले आहे. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारची संकटे टाळायची असेल, तर आपण यावर वेळीच उपाय योजना करायला हव्यात, असे रामराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

सध्या अनेक ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रीक वाहने दिसत आहेत. याची संख्या वाढायला हवी. याची सुरुवात आमदारांपासून आम्ही करत आहोत. कदाचित त्यांना इलेक्ट्रीक वाहने घेण्यासाठी काही मदत करता येईल का असाही विचार आम्ही करत आहोत, असेही रामराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘दरेकर काहीही चुकीचे बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केला आहे’
रुपाली चाकणकरांनी दाखल केली भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याविरोधात तक्रार; म्हणाल्या, मला न्याय मिळेल अशी अपेक्षा
ज्या गुरूने विद्या शिकवली त्याच गुरूला कायमचे संपवले; वाचा अट्टल गुन्हेगारालाही लाजवनारी आनंद गिरीची भयानक कृष्णकृत्ये…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.