भल्याभल्यांना घाबरवणाऱ्या या व्हिलनची शेवटच्या दिवसांत खूप वाईट अवस्था झालती, ओळखूही येत नव्हता

बॉलीवूडमध्ये अनेक खलनायक आले आणि गेले पण या खलनायकासारखा खलनायक कोणीही होऊ शकला नाही. ८० आणि ९० च्या दशकामध्ये या खलनायकाने बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रत्येक हिरोचे जगणे कठीण केले होते. हे खलनायक होते रामी रेड्डी.

रामी रेड्डीचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. त्यांचे पुर्ण नाव गंगा सानी रामी रेड्डी होते. त्यांनी त्यांचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर एका न्युज पेपरसाठी काम करण्यास सुरुवात केली. या कालावधीमध्ये रामी रेड्डीला एका दिग्दर्शकाने पाहिले आणि त्यांना एका साऊथ चित्रपटाची ऑफर दिली.

रामी रेड्डीने या चित्रपटाला होकार दिला. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा सुपरहिट झाला. या चित्रपटानंतर रामी रेड्डीला अनेक पुरस्कार मिळाले. या चित्रपटाची प्रसिद्धी पाहून बॉलीवूडमध्ये या चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला. या चित्रपटात देखील रामी रेड्डीनेच खलनायकाची भुमिका निभावली होती. हा चित्रपट होता ‘प्रतिबंध’.

प्रतिबंध चित्रपटानंतर रामी रेड्डीला बॉलीवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटानंतर त्यांनी ‘वक्त हमारा है’ या चित्रपटात ‘कर्नल चिकारा’ची भुमिका निभावली. या चित्रपटाने आणि खलनायकाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले.

या चित्रपटातील त्यांचा प्रत्येक डायलॉग हिट झाला होता. एवढेच नाही तर या चित्रपटानंतर त्यांना कर्नल चिकारा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा अभिनय, डोळ्यातील राग यामूळे ते खलनायक म्हणून चांगलेच सुट करायचे.

रामी रेड्डी बॉलीवूडच्या दुसऱ्या खलनायकसारखे नव्हते. कारण दुसरे खलनायक हे नेहमी ओरडायचे, मारामारी करायचे. पण रामी रेड्डी मात्र फक्त डायलॉग बोलायचे आणि सगळेजण घाबरायचे. रामी रेड्डीचा चेहरा आणि दमदार डायलॉग या दोनच गोष्टी चित्रपटाला सुपरहिट बनवू लागल्या होत्या.

रामी रेड्डीने एलान, दिलवाले, हत्यारा, गुंडा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले. रामी रेड्डी जेव्हा पडद्यावर यायचे तेव्हा त्यांचा चेहरा आणि बॉडी बघून अनेक हिरो घाबरायचे. बॉलिवूडमध्ये त्यांनी काला, बाबा, बाबा नायक अशा खलनायकाच्या भुमिका निभावल्या आहेत.

२००० पर्यंत रामी रेड्डी बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  त्यांनी अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. रामी रेड्डीचा चेहराच काही असा होता की, तो बघितल्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये फक्त खलनायक म्हणून काम मिळायचे.

चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून सर्वांना घाबरवणाऱ्या रामी रेड्डीला मात्र अनेक गंभीर आजारांनी घाबरून ठेवले होते. रामी रेड्डीला लिव्हर प्रॉब्लेम सुरु झाला होता. त्यामुळे त्यांची तबियत खुप खराब झाली होती.

पण तरीही रामी रेड्डीने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले नाही. ते साऊथ चित्रपटांमध्ये काम करत होते. काही दिवसांनी मात्र त्यांची तबियत आणखी खराब होऊ लागली. त्यामुळे त्यांना अभिनय सोडावा लागला.

रामी रेड्डीला त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये ओळखणे सुद्धा कठीण झाले होते. कारण त्याने वजन खुप कमी झाले. चित्रपटांमध्ये अनेकांना घाबरवणाऱ्या रामी रेड्डीची स्थिती खुप वाईट झाली होती.

२०११ मध्ये रामी रेड्डीने सिकंदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. पण त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे २५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट आणि त्यांचा अभिनय लोकांच्या मनामध्ये कायम राहील.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.