Maratha Kranti Morcha : नुकतीच राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बाबतीत ही ऑडिओ क्लिप होती. या क्लिपमध्ये रमेश केरे यांचाही उल्लेख होता. ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होती.
त्यानंतर आता रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन केले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
https://www.facebook.com/100008138553200/videos/799562684710887/?app=fbl
या फेसबुक लाईव्हमध्ये रमेश केरे म्हणाले की, आशा, अक्षद भैया, गौरी मला माफ करा. सर्व बांधवांना शेवटचा जय जिजाऊ जय शिवराय. आजवर माझ्या पद्धतीने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, विद्यार्थ्यांना न्याय या सगळ्या मागण्यांसाठी मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करत आलो आहे.
माझ्या बांधवांशी काहीतरी बोलण्यासाठी मी आज शेवटचं फेसबुक लाईव्ह मधून समोर येत आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की, आजवर प्रामाणिकपणे माझं काम सुरु होतं. सरकारने त्या कामाची वेळोवेळी दखलही घेतली. मात्र,आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मला जाणूनबुजून बदनाम केले जात आहे. आजवर मी माझ्या समाजाचं नुकसान होईल असं काहीच केलेलं नाही, असे ते म्हणाले आहेत.
तसेच मी आजवर जे काही केलं ते फक्त समजाला न्याय मिळावा यासाठीच केलेलं आहे. ज्याप्रकारे माझी बदनामी सुरु आहे, ती बदनामी मी सहन करु शकत नाही. मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की, माझ्यावर ज्या लोकांनी आरोप केले, ज्यांनी माझी बदनामी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी ती क्लिप व्हायरल केली त्यांची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
Shivsena : शिवसेना का सोडली? छगन भुजबळांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी बाळासाहेबांनी…
health : सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याची प्रथा का आहे? यामागचे वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल
Tukaram munde : २ मिनीटांत ब्लड टेस्ट! ‘त्या’ मशिनसाठी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तुकाराम मुंडेनीही लावली हजेरी