डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यावर रामदेवबाबा यांचे एक पाऊल मागे, वादाला पूर्णविराम

नवी दिल्ली । योगगुरु रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या वक्तव्यामुळे देशातील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. याबाबत आयएमएने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांची तशी भावना नसल्याचे सांगितले आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी रामदेव बाबा यांना याबाबत एक पत्र पाठवून आवाहन केले होते.

त्यांनी वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले होते. योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळं वाद वाढत होता. दरम्यान या वादाला आता पूर्वविराम मिळाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत योगगुरु रामदेव यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

त्यांनी आपण केलेले वक्तव्य मागे घेत असल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणे दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत.

सध्या कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्याने खूप दु:ख झाले. आपण जे स्पष्टीकरण दिलंय तेवढ्याने वेदना, दु:ख शमणार नाही. असेही त्यांनी म्हटले होते.

या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरु रामदेव बाबांविरोधात कडक पवित्रा घेतला होता. यामुळे रामदेवबाबा यांनी आता माघार घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आता हे प्रकरण शांत होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

पैलवान सुशिल कुमारने ‘अशी’ केली सागर धनखडची हत्या; धक्कादायक कारणही आले समोर

“माझ्या आईचा फोन कुणी घेतला असेल तर परत आणून द्या”, चिमुकलीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

माणुसकी मेली! फक्त ११ हजारांसाठी रुग्णाच्या पत्नीचं हॉस्पीटलने ठेवून घेतलं मंगळसुत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.