कोरोनिल औषधाच्या वादावरून रामदेव बाबा भडकले, म्हणाले…

दिल्ली | बाबा रामदेव यांनी कोरोनिलच्या औषधावरून त्यांच्यावर केलेले सगळे आरोप फेटाळले आहेत. आयुष मंत्रायलायने कोरोनिलबाबत खुलासा केला होता की, पंतजलीने आमच्याकडे सर्दी खोकल्याचा औषधासाठी परवानगी मागितली होती त्यात कोरोनाचा उल्लेख नव्हता. 

यावर रामदेव बाबा म्हणाले आहेत की, पंतजली ने योग्य दिशेने काम करणे सुरू केले आहे याची प्रशंसा करा असे मी म्हणत नाही पण कमीत कमी बदनामीतरी करू नका.

आमच्या या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण १०० टक्के बरे झाले आहेत. तेही ७ दिवसात. आम्ही आधुनिक शास्त्रानुसारच काम केले आहे. असे बाबा म्हणाले आहेत.

पुढे विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, ज्या प्रमाणे देशद्रोह्यावर आणि दहशतवाद्यावर विरोधाच्या तक्रारी आणि गुन्हे दाखल केले जातात त्याचप्रमाणे माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आली.

काही लोकांचे देशात घाणेरडे वातावरण तयार करण्याचे काम चालू आहे. आम्ही औषधाची रीतसर परवानगी घेऊन आणि शासकीय मापदंडाचे पालन करून संशोधन आणि निर्मिती केली आहे. एक पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी ही माहिती दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.