Share

Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदम यांची धमकी

Ramdas Kadam on Anil Parab : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) गटांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ठेवण्यात आला आणि त्यांचे हाताचे ठसे घेतले गेले. या वक्तव्याने मोठा राजकीय गदारोळ माजला होता.

यानंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं, “रामदास कदम यांनी केलेला आरोप 100 टक्के खोटा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळी मातोश्रीवर हजारो लोक होते. दोन दिवस मृतदेह ठेवणे शक्यच नाही. अशी निरर्थक वक्तव्यं करून त्यांनी आपली प्रतिमा कलंकित केली आहे.”

मात्र, आता कदम यांनी परब यांना प्रत्युत्तर देत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर वैयक्तिक टीका केली. त्यांनी वापरलेले शब्द अत्यंत निकृष्ट आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावर बोलायला हवं होतं, पण त्यांनी मौन बाळगलं. त्याऐवजी अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोललं.”

कदम पुढे म्हणाले, “मी कोर्टात जाणार आहे. मातोश्रीमध्ये डॉक्टरांची टीम होती ही माहिती चुकीची आहे. मी स्वतः लोकांसमोर जाहीर केलं होतं की बाळासाहेब ठाकरे गेले आहेत. जर डॉक्टरांची टीम होती, तर त्यांचं नाव सांगावं. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत आणि परबच का बोलतो?”

याचबरोबर कदम यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटलं की, “विलेपार्ले (Vile Parle) परिसरातील SRA योजनेत अनिल परब यांनी 8 हजार मराठी लोकांना घरं खाली करून घेण्यास भाग पाडलं आणि फक्त एका वर्षाचं भाडं दिलं. त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून बिल्डरकडून दोन गाड्या घेतल्या.”

यासोबतच कदम यांनी परब यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करत सांगितलं की, “अनिल परब यांच्या नावावर अनेक बोगस कंपन्या आहेत. मी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटणार असून, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र देऊन चौकशीची मागणी करणार आहे.”

या संपूर्ण घडामोडीत पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे. कदम यांनी दिलेला थेट इशारा राजकीय वातावरण तापवणारा ठरला आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now