Ramdas Kadam : शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद काही केल्या संपताना दिसत नाही. कुठल्यातरी मुद्द्यावरून दोन्ही गटातील नेत्यांच्या सतत एकमेकांवर टीका सुरु आहेत. यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
रामदास कदम दापोली येथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून मला संपवण्याचा प्रयत्न सुरु होता. तसेच मला संपवण्यासाठी माझ्याकडे पर्यावरण खाते देण्यात आले. त्यांना वाटले की, यांना काही कळणार नाही.
परंतु, माझ्याकडे पर्यावरण खाते असताना मी एक वर्ष अभ्यास करून प्लास्टिक बंदीचा कायदा आणला असे त्यांनी सांगितले. त्यावेळी आदित्य ठाकरे टुणटुण उड्या मारत आले आणि प्लास्टिकबंदीचा कायदा मी केला असे सांगू लागले, असेही ते म्हणाले.
तसेच आदित्य ठाकरेंनी आधी लग्न करून पाहावे म्हणजे त्यांना संसार काय असतो ते कळेल, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. यावेळी बोलताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना फसवले असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर एक बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवत यांना मुख्यमंत्री करा असे म्हटले होते. त्यानंतर एका दिवसात निर्णय बदलला व उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले, असे कदम यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंवरही टीका केली.
रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले की, आमच्या रश्मी वाहिनी मंत्रिमंडळात कशा काय आल्या नाही याचे आश्चर्य वाटते. तसेच माँसाहेब कधीच कुठल्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, पण रश्मी ठाकरे कुठेही उद्धव ठाकरेंच्या सोबत असतात, असेही ते म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले असून बाकीवेळेत ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करायचे. तसेच रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असे रामदास कदम म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्लास्टिककरिता लागणारा सगळा कच्चा माल हा अंबानींकडून पुरवला जायचा. त्यामुळे हा प्लास्टिक बंदीचा कायदा थांबवण्यासाठी अंबानींनी जवळपास ३२ वकील न्यायालयात हजर केले होते. त्याचवेळी माझा केवळ एक वकील होता. मात्र, तरीही अंबानी प्लास्टिकबंदीच्या कायद्याला थांबवू शकले नाहीत, असेही रामदास कदम यांनी सांगितले.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण कुटुंबाला धारेवर धरले आहे. त्यामुळे आता या टीकांवर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच यातून ठाकरे आणि शिंदे गटाच्या नव्या वादाला सुरुवात होते का?, हे पाहणे महत्वाचे ठरते.
महत्वाच्या बातम्या
breaks old traditions : जुन्या रुढीपरंपरांना फाटा देत मारुती मंदिरात महिलांचा प्रवेश; थेट गाभाऱ्यात फोडला नारळ
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीची हाक, म्हणाले मैत्रीसोबत क्षमासुद्धा…
Corruption : भाजप मंत्र्याच्या कामगाराचा प्रताप! पगार १० हजार अन् राहतोय अडीच कोटीच्या घरात, सांभाळतोय ४ बायका
Congress : काॅंग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंना हटवून ‘या’ नेत्याला करणार प्रदेशाध्यक्ष