Share

रामदास आठवलेंनी घेतला शशी थरूर यांचा इंग्रजीचा क्लास, गंमतीशीर ट्विट्स झाले व्हायरल

Ramdas-Athvale-Shashi-Tharor.

तिरुवनंतपुरमचे(Tiruantpuram) काँग्रेस(Congress) पक्षाचे खासदार शशी थरूर(Shashi Tharur) आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athvale) यांच्यात ट्विटरवर इंग्रजी विषयावरून ‘युद्ध’ रंगले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जातात. पण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटमधील इंग्रजी शब्दांमधील एक चूक पकडली.(ramdas athvale & shashi tharur conversation tweets viral)

यावर काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी ती चूक मान्य करत पुन्हा एक ट्विट केले. या ट्विटमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यातील मजेशीर संवादाचे ट्विट्स व्हायरल झाले आहेत.

पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये शशी थरूर यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दिसत आहेत. या फोटोत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मागे बसलेले दिसत आहेत.

या ट्विटमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते शशी थरूर यांनी लिहिले की, “अर्थसंकल्पावर सुमारे दोन तास चर्चा झाली. मंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव सारे काही सांगत आहेत. मागच्या रांगेत बसलेल्यांनाही अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाबाबतच्या दाव्यांवर विश्वास बसत नाहीये.” शशी थरूर यांच्या ट्विटला उत्तर देत असताना रामदास आटवले यांनी त्यांची इंग्रजी शब्दांमधील एक चूक पकडली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ट्विट करत म्हंटले की, “प्रिय शशी थरूर जी, अनावश्यक विधाने करताना चुका होणारच असे म्हणतात. या ठिकाणी ‘Bydget’ नव्हे तर ‘BUDGET’ आणि ‘rely ‘ नसून ‘reply’ असे पाहिजे. पण आम्ही समजू शकतो”, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना दिले.

त्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या चुका मान्य करत पुन्हा एक ट्विट केले. या ट्विटमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, “निष्काळजीपणे टाइप करणे हे वाईट इंग्रजीपेक्षा अधिक वाईट आहे. पण तुम्ही शिकवत असल्याने जेएनयूमधील एका व्यक्तीला तुमच्या शिकवणीचा फायदा होऊ शकतो.” अनेकांनी या ट्विटवर गंमतीशीर कंमेंट्स केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
..तोपर्यंत धार्मिक कपडे परिधान करण्याचा आग्रह धरू नये, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी ‘या’ व्यक्तीसोबत मिळून माझ्यावर हल्ल्याचा कट रचला, सोमय्यांचा गौप्यस्फोट
जन्मदात्या आईने चिमुकल्याला साडीला बांधून दहाव्या मजल्यावर लटकवले, कारण वाचून चक्रावून जाल

राजकारण

Join WhatsApp

Join Now