मुंबई | बुधवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अवमान केला असल्याचेही आठवले यांनी म्हंटले आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदावर राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतीमेला काळिमा फासणारी आहे. याचबरोबर लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणं आवश्यक होतं, असेही आठवले म्हणाले.
पुढे बोलताना आठवले म्हणाले, ‘अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून ट्रम्प यांनी नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते.’
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा : …तर दुर्घटना घडली नसती; RTIच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
‘बर्ड फ्लू’ अलर्ट! चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; WHOने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
पोलीस चौकशीनंतर कंगनाने व्यक्त केला संताप, ‘तुम्ही राष्ट्रवादी असाल तर…’