शेतकऱ्यांचं आंदोलनाबाबत रामदास आठवले यांचं खळबळजनक विधान, म्हणाले…

मुंबई | नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला. मात्र किसान सभेने मुंबईत केलेलं हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी संस्ट असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आठवले यांनी म्हंटले की, “मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही”, असे मोठे विधान आठवले यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे,’ असेही रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, “केंद्र सरकारने कायदा केला असून तो मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांनी आता आंदोलन थांबवायला हवं,” असे आठवले यांनी म्हटले आहे. आठवलेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

याचबरोबर केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत असून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काम करत असल्याचेही आठवलेंनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी आता सरकारचे ऐकून घ्यायला हवं आणि आंदोलन थांबवायला हवं, असेही आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
नकलीपणाच्या ‘त्या’ आरोपावर रोहित पवारांचे निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल; ‘राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण….’
“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.