मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या वेगवेगळ्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी कोरोनावर कविता लिहिली आहे. ‘गो कोरोना गो, कोरोना गो, नो कोरोना नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा, अशी कविता त्यांनी लिहिली आहे.
ते म्हणाले, मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना’चा नारा दिला. कोरोना वाढतोय, त्यावर मी कविता केलीय. पण कोरोनाने मलाही सोडलं नाही. मलाही कोरोना झाला. त्यामुळे मी नवी कविता करतोय, ‘गो कोरोना गो, कोरोना गो.नो कोरोना नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली. सरकार आगामी काळात पडेल का, हे आता तरी सांगता येणार नाही. पण येत्या काळात वादामुळे हे सरकार पडेल असे वाटते, असेही ते म्हणाले.
रामदास आठवले हे आपल्या वेगवेगळ्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यानी गो कोरोना गो ही घोषणा दिली होती. ती देखील प्रसिद्ध झाली होती. त्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
रामदास आठवले हे आपल्या भाषणातून देखील अनेकवेळा कविता करत असतात. अगदी सहज बसल्या बसल्या ते कविता करत असतात. आता ही केलेली कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ही ऑफर
आधी देश मग कुटुंब; वडिलांच्या निधनानंतरही सिराज मोहम्मद थांबणार ऑस्ट्रेलियातच
सलग तीन रात्र ताज समोरच्या फुटपाथवरच थांबून होते रतन टाटा; कारण ऐकून डोळ्यांत पाणी येईल