…म्हणून तुम्ही राज ठाकरेंच्या नादी लागू नका; रामदास आठवलेंचा भाजपला सूचक इशारा

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला इशारा दिलाय. “भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, भाजपाला मनसेमुळे नुकसान होऊ शकतं,” असं मत त्यांनी मांडलं आहे.

तसेच पुण्यात झालेल्या पत्रकार परषदेत त्यांनी रिपब्लिकन पार्टीला पुण्यात महापौर पद आणि मुंबईत उप महापौर पद मिळावं अशी मागणी केली आहे. तसेच जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे अस देखील त्यांनी यावेळी म्हटलंय.

“भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचं नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. भाजपने मनसे ची साथ दिल्यास भाजपला उत्तर प्रदेश मधील आगामी निवडणुकीत फटका बसू शकतो,” असा सूचक इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिलाय.

“राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळालं पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर पद मिळाले पाहिजे. त्याचबरोबर पुण्यात 15 ते 20, तर मुबंईमध्ये 30 ते 35 जागा लढवण्यासाठी मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी आठवले यांनी केली.

महाविकास आघाडीच्या सरकार बद्दल बोलताना आठवले म्हणाले की, “सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही. सर्व यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या, तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाही. सरकार अस्थिर करायचं असतं तर एक वर्षांपूर्वी केलं असतं. पवार साहेबाचा आदर असून त्यांच्या मताशी मी सहमत नाही. केंद्र सरकार धाडी टाकायला लावत नाही.”

पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी जम्मू काश्मीर च्या मुद्द्याला देखील हाथ घातला, “जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा डाव आहे. अनेकजण उद्योग-व्यवसाय करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये येत असतात. त्यांना दहशतवादी मारत आहेत. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला लागेल.

पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल, तर दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आरपारची लढाई करायला लागेल. पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही”. असे विधान आठवले यांनी केले.

 

महत्वच्या बातम्या
वादात अडकलेल्या शाहरुख खानसोबत काम करण्यास अभिनेत्री समंथाचा स्पष्ट शब्दात नकार
इंधन दरवाढ थांबावी, महागाई नसावी, सामान्यांना अच्छे दिन यावेत हिच नरेंद्र मोदींची इच्छा – पंकजा मुंडे
अमरिंदर सिंह यांनी केली स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची घोषणा; भाजपसोबत करणार युती
कोरोनात बड्या सेलिब्रिटींची फी दुप्पट, पण गरिबांचे मात्र पगार कापले; ‘हा’ अभिनेता उभा राहीला बॅकस्टेज कलाकारांच्या बाजूने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.