रामविलास पासवानांचा मृत्यू संशयास्पद? मुलगा चिरागवर संशय, न्यायालयीन चौकशीची मागणी

मुंबई | लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान आहे, त्यांचे पुत्र चिराग पासवान यांचे वर्तन संशयास्पद आहे, असा आरोप आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षाने केला आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. HAM चे प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी या प्रकरणात एलजीपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर संशय घेतला आहे.

रिजवान यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, पासवान यांच्या चितेचा अग्नी शमला नव्हता, तोच चिराग पासवान यांनी एका शूटिंगमध्ये राक्षसी हास्य करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात उपचार सुरु असताना पासवान यांच्या भेटीची केवळ तिघांनाच परवानगी का होती? रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे चिराग पासवान यांनी कट रचला आहे, त्यांची भूमिका संशयास्पद आहे,असा आरोप रिजवान यांनी केला.

तसेच रामविलास पासवान यांच्या निधनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत, ज्यामुळे चिराग पासवान यांच्याबद्दल संशय निर्माण होतो, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा कोणाच्या सांगण्यावरुन हॉस्पिटल प्रशासनाला मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यापासून रोखलं गेलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, रिझवान यांनी या प्रकरणी चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणती गुपिते लपवली जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे दानिश रिझवान यांनी विचारले आहे. रिझवान यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
कोणाच्या जीवावर माज करतात; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल संतापल्या
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.