“सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हटल्या ते बरोबर होतं; त्यांना पुढे काय होणार दिसलं होतं”

नवी दिल्ली | देशात कोरोनाने वर्षभरापासून थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

देशात वाढत्या रुग्णसंखेमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. अशातच बॉलिवूडमधीलही अनेक अभिनेत्यांनी देशातील परिस्थीतीवरून मोदींवर टीका केली आहे.

अशातच प्रसिध्द चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनीही भाष्य केलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं कौतूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. वर्मा म्हणाले, “सोनिया गांधी २०१४ मध्ये म्हणाल्या होत्या की नरेंद्र मोदी मौत का सौदागर आहेत. मला कधीच माहित नव्हतं की त्या इतक्या दुरदृष्टीच्या आहेत”.

“सोनियाजी मी मनापासून दिलगीरी व्यक्त करतो आणि शक्य असल्यास  तुम्ही तुमच्या पायांचा फोटो पाठवा. जेणेकरून मी सन्मानाने स्पर्श करू शकेन”. असं निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा म्हणाले आहेत.

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर चित्र निर्माण झाले आहे. रुग्णांचा उपचाराअभावी अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत आहे. यावरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मोदी सरकारला अनेक सवाल विचारले आहेत.

राम गोपाल वर्मा बॉलिवूड विश्वातील मोठं नाव आहे. रंगीला, सत्या, रक्त चरित्र, सरकार, दौड, ग्रेट रॉबरी यांसारख्या अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. राम गोपाल  वर्मा हे  देशात घडत असलेल्या गोष्टींवर नेहमी मत मांडत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.