‘आगे आगे देखो, होता है क्या,’ शरद पवार-अमित शाह भेटीवर भाजप नेत्याचे वक्तव्य

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी नवे वक्तव्य करुन संभ्रम आणखीनच वाढवला आहे. राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया दिली. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी – भाजप युती होणार?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही मला माहीत नाही. परंतु अमित शहा यांच्या बोलण्यातून तसे संकेत मिळत आहेत. भेट झाली नसती तर भेट झाली नाही, असे ते म्हणाले असते.

‘पवार आणि शहा यांची एवढी निवांत भेट का झाली, हे मला माहीत नाही. त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही. भारतीय संस्कृतीत अशा भेटी होतच असतात. या भेटींना राजकारणाच्या पलिकडे पाहिलं पाहिजे,’ असेही पाटील म्हणाले.

भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याला तुम्ही तयार असाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘मी सच्चा स्वयंसेवक आहे. पक्षश्रेष्ठी ठरवेल ते मला मान्य असेल. शेवटी पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि आज्ञा नेहमी पाळायची असते, असे सूचक विधानही पाटील यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या 

फिल्मी आणि खऱ्या पोलिसांमध्ये जमिन आस्मानचा फरक असतो- उद्धव ठाकरे

#Lockdown : लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.