राष्ट्रवादीचा सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

मुंबई | विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे जेष्ठ नेते राम शिंदे यांचा विक्रमी मतांनी पराभव करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी विजय मिळवला. काल आ. रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास १ वर्ष पूर्ण झाले.

याचाच धागा पकडत राम शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत ते अहमदनगरला कर्जत येथे बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर भाष्य केले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ‘मी केलेल्या कामांचं भूमीपूजन मंत्र्यांचे हस्ते झाले असतानाही, ते पुन्हा एकदा त्याच कामांचे भूमीपूजन करत आहेत. कोंबड्याची पिल्ल, मासे, आणि बियाणं इथं विकून ते धंदा करत आहेत, समाजकारण नाही,’ असा घणाघाती हल्ला शिंदे यांनी केला.

‘७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु असून याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला,’ असल्याचे राम शिंदे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास काल वर्ष पूर्ण झाले. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. याच पार्श्वभूमीवर, राम शिंदेंनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

 

महत्त्वाच्या बातम्या
कोरोना संकट! पुणेकरांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी अभिमानास्पद बातमी
लॉकडाऊन काळात नियमित हफ्ते भरणाऱ्यांना बँक देणार कॅशबॅक; वाचा सविस्तर
हनीमूनला गेलेल्या मुंबईतील दांपत्याने कतारमधील जेलमध्येच दिला मुलीला जन्म 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.