‘राम मंदिरासाठी लोकांकडून १० अब्ज रुपयांचा निधी गोळा करणार; विश्व हिंदू परिषदेचा संकल्प’

 

नवी दिल्ली | अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला राम मंदिराच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. राम मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता.

आता राम मंदिराच्या बांधकामास मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे. त्यामुळे आता राममंदिर उभारणीसाठी लोकांकडून वर्गणी काढून १० अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्व हिंदू परिषद करत आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी एवढा पैसा उभा करण्याचा संकल्प विश्व हिंदू परिषदेने केला आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर १००० वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत हे बांधकाम केले जात आहे.

१० अब्ज एवढा निधी गोळा करण्यासाठी ४ लाख गावांमधील १० कोटी कुटुंबीयांशी विश्व हिंदू परिषदेकडून संपर्क साधला जाणार आहे. या प्रत्येक कुटुंबाकडून १०० रुपये मंदिराच्या बांधकामासाठी घेतले जाणार आहे.

तसेच हे नियोजन यशस्वी ठरल्यास १० अब्ज रुपयांचा निधी गोळा होऊ शकणार आहे. तसेच यासाठी विशेष संपर्क अभियानाची आखणीही होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.