भाजपाचा इशारा; ‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा…’

मुंबई | देशभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. मात्र, यंदा मात्र शिवजयंतीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट असणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. यावरून आता राजकारण तापले आहे.

‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे. राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते.

मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल कदमांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; वाचा कुठले नियम पाळावे लागतील?
‘शरद पवारांसारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याने आहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावू नये म्हणून…’
मंत्री कार्यकर्त्याला सांगतात ‘आधी त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घे’; आॅडीओ क्लिप व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.