रिहानाचा टॉपलेस फोटो आणि गळ्यातील पेंडेंट पाहून राम कदम संतापले, म्हणाले…

शेतकरी आंदोलनात ट्विट केल्यामुळे अमेरिकेची पॉप सिंगर रिहाना चर्चेत आली होती. तिने ट्विट केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. पण आता पुन्हा रिहाना चर्चेत आली आहे. रिहाना तिच्या गाण्यांमुळे आणि विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

एका लिंगरी ब्रँडच्या फोटोशूटच्या दरम्यान तिने गळ्यात गणपतीचे पेंडेंट घालून शूट केले आहे. यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नेटकऱ्यांनी असा आरोप केला आहे की रिहानाने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

भाजप नेते राम कदम यांनीही यावर आक्षेप दर्शवला आहे. राम कदम यांनी ट्विट केले आहे की, रिहानाने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू धर्मियांची खिल्ली उडवली आहे ते अतिशय नीच कृत्य आहे. भारतीय संस्कृतीबद्दल रिहानाला काहीही माहीत नाही आणि या सांस्कृतीबद्दल तिला अजिबात आदर नाही, हे यातून स्पष्ट होत आहे.

आतातरी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेते तिची मदत घेणे थांबवतील अशी आशा आहे. या पद्धतीने राम कदम यांनी रिहानावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रिहानाचा फोटो ट्विट करत तिच्यावर टीका केली आहे. दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर रिहाना चर्चेत आली होती.

तिच्यानंतर अनेक हॉलीवूड कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केले होते. अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. रिहानाने ट्विट केल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी आणि अनेक बड्या नेत्यांनी सुनावले होते की तुला भारताच्या प्रकरणात तोंड घालण्याचा काहीही अधिकार नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.