अर्नब अटक! राम कदम आक्रमक म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे’ 

मुंबई | अर्णब गोस्वामी यांना वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी मुंबईच्या राहत्या घरातून अटक केली. यानंतर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अर्नब गोस्वामी यांच्या अटकेच्या प्रकरणावरून भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा तिखट शब्दात कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच पुढे बोलताना कदम म्हणाले, ‘आज लोक अर्णबच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. जबरदस्ती आणीबाणी लागू करुन कुणाच्याही आवाजावर केलेली दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राम कदम यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. तसेच जामिनावरचा निर्णय न्यायालयाने राखीव ठेवल्यानंतर रविवारी अर्णबची रवानगी अलिबाग येथील क्वारंटाइन सेंटर मधून तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राम हे आज ११ वाजता तळोजा जेलमध्ये अर्नब गोस्वामी यांनी भेटायला जाणार आहेत.

याबाबत ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारला इशारा देखील दिला. ते म्हणतात. ‘मी सकाळी ११ वाजता मी तळोजा तुरुंगात अर्णब गोस्वामी यांना भेटायला जाणार आहे. हिम्मत असेल तर थांबवून दाखवा.. १३० कोटी देशवासीयांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांना भेटायला निघालोय,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तळोजा कारागृहात जाऊन अधिकारी कौस्तुभ कुर्लेकर यांची भेट घेतली आहे. यावेळी सोमय्या यांनी अर्णव यांना कारागृहात कोणत्याही प्रकारची मारहाण करू नये आणि चांगले जेवण द्यावे, अशी विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आरसीबीच्या अपयशानंतर सुनील गावसकरांनी विराटला धु धु धुतले; म्हणाले
बाजारमुल्यापेक्षा कमी किंमतीत करा सोन्यात गुंतवणूक; मोदी सरकारने दिली खुशखबर!
पोलीस व्हॅनमधून कानी पडल्या किंकाळ्या; ‘माझ्या जिवाला धोका..मला जेलरने मारलंय’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.