मुंबई | संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये घडली आहे. रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बाळांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री २च्या सुमारास ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाला.
या घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ‘भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये १० निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.
महाराष्ट्र #भंडारा जिल्हय़ातील #हॉस्पिटल मध्ये 10 निष्पाप बालकांचा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू.. ही हत्या आहे.. त्याला जबाबदार #महाराष्ट्रसरकार आहे #MVA @CMOMaharashtra @rajeshtope11
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 9, 2021
भंडारा घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!”, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली.
मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत…
याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भंडाऱ्याच्या घटनेनंतर ठाकरे सरकारला आली जाग; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय…
भंडाऱ्याच्या घटनेवर राहुल गांधींनी व्यक्त केली हळहळ; ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी
कोरोना लसीच्या दोन डोसांमध्ये अंतर का ठेवतात? ‘हे’ आहे कारण