‘पुढच्या वेळेस कोर्टात जाताना मलम सोबत न्या, म्हणजे सुजलेले व काळे तोंड लपवता येईल’

सर्वोच्च न्यायालयाने आता अनिल देशमुखांना दणका दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत होते पण आता त्यांना सीबीआय चौकशीला सामोरे जावेच लागणार आहे. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते.

त्यानंतर अनिल देशमुखांनी सुप्रिम कोर्टाला मागणी केली होती की, या प्रकरणात आपली बाजू कोणीच ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होणारी आपली चौकशी रोखण्यात यावी. मात्र सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य आहे असे सांगत सुप्रिम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला आहे.

या निर्णयानंतर आता त्यांच्याकडे सीबीआय चौकशीला सामोर जाण्याच्या ऐवजी कुठलाही पर्याय उरलेला नाही. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी पुन्हा महाविकास आघाडीला वेठीस धरले आहे.

भाजप नेते राम कदम यांनी सरकारवर आणि अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. राम कदम म्हणाले आहेत की, सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्रद्रोही आणि वसुली सरकारच्या थोबाडीत मारली आहे. पुढच्या वेळेस जेव्हा पण सुप्रिम कोर्टात जाल तेव्हा सोबत मलम घेऊन जावा. जेणेकरून सुजलेला आणि काळा झालेला चेहरा लपवता यावा.

काय म्हणालं सुप्रिम कोर्ट..
त्यानंतर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, आरोप अतिशय गंभीर आहेत. आयुक्तांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांवरच गंभीर आरोप झाले आहेत. गृहमंत्र्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही.

यापुर्वी जेव्हा आदेश देण्यात आले होते तेव्हा ते पदावरच कार्यरत होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची स्वतंत्र खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे, असं सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. तसेच यामुळे महाविकास आघाडी सरकारलाही मोठा झटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या
सनी देओलला चित्रपटात घेतले तर पुढच्या चित्रपटात धर्मेंद्र फुकट काम करणार; बाप लेकाची अजब ऑफर
ब्रेकिंग: सीबीआय चौकशीचा निर्णय योग्यच; सुप्रिम कोर्टाचा अनिल देशमुखांना मोठा झटका
कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.