मुंबई | हैदराबादमधील महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर भाजपच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.
कदम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बिहारनंतर हैद्राबादमध्ये देखील यश मिळवले आहे. यामधून देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येते. यामुळे नागरिकांनी विकासाचा स्विकार केला असून मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचाच भगवा फडकणार असल्याचा मला विश्वास आहे.
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में भाजपा को बिहार में जीत और फिर हैदराबाद में जिस तरह की सफलता मिली यह बताता है कि देश को मोदी जी के नेतृत्व पर कितना भरोसा है, लोगो ने विकास की बात मान ली है। हमे पूरा विश्वास है कि BMC पर भी भाजपा का भगवा लहराएगा।
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 5, 2020
ते पुढे म्हणाले, ३० वर्षांच्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. कोरोनाच्या काळात देखील जो निष्काळजीपणा केला तो लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार. असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
शिवसेना का 30 साल के भ्रस्टाचार से लोग पीड़ित है। कोरोना संकट में जो लापरवाही की यह लोगो को याद है। हमे विश्वास है कि BMC पर भाजपा का झंडा लहराएगा।
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 5, 2020
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपने मुंबई महापालिका हे पुढचं लक्ष्य ठेवल आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं आवश्यक आहे हे भाजप जाणून आहे. त्यामुळं मुंबईतही विशिष्ट रणनीती घेऊन उतरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. त्यामुळेच, भाजपनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या दृष्टीनं भाजपच्या नेत्यांकडून सूचक वक्तव्यही केली जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय.