मुंबई | भाजप नेते राम कदम हे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्यांच्या वादग्रस्त विधानांवरून ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी थेट पोलिसांनाच फोन लावला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलताना प्रकरण मिटवण्याची विनंती राम कदम यांनी केली आहे.
दरम्यान, पवईच्या हिरानंदानीच्या गॅलरिया मॉलजवळ एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपचे कार्यकर्ते धडकले होते. हे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींना ताब्यात घेतले होते.
यावेळी घटनास्थळावरून आरोपींना ताब्यात घेऊन जात असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला रिक्षात मारहाण केली. आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी, आणि आयुष राजभर या भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल यांच्या चेहऱ्यावर हातातील कड्याने वार केले. तसेच या आरोपींनी नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन केले.
आरोपींच्या सुटकेसाठी राम कदम यांनी पोलिसांनाच फोन केला. त्यांनी या आरोपींना सोडण्यासाठी विनंती केली आहे. ‘मी या आरोपींच्या कृत्याचे समर्थन करत नाही. पण त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांच अजून लग्न झालेले नाही. भविष्याचा विचार करत त्यांना माणुसकीच्या नात्याने सोडा. आपापसात हे प्रकरण मिटवता येईल’ असं राम कदम फोनवर पोलीस आधिकाऱ्याला बोलत असल्याचे ऐकू येतात.
यापुर्वी मुंबईतल्या दहिहांडी कार्यक्रमात राम कदम यांनी युवकांसमोर बोलताना ‘’तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि ती तुम्हला नकार देत असेल, तर ती मुलगी पळवून आणून तिचे त्या तरुणाशी लग्न लावून देईन’’ असं केलेल्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली होती. अबू आझमी, अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपुत या मुद्द्यांवर अनेक वेळा राम कदम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
दरम्यान, याप्रकरणात माझाही आत्मसन्मान आहे, मी तुमची काहीही मदत करु शकत नाही. असे फोनवर कॉन्स्टेबलने राम कदम यांना सांगितले आहे. हे सर्व आरोपी भाजपच्या आयटी सेल आणि इतर मोर्चांवर कामे करत असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
भाजपचे राम कदम अर्णब प्रकरणात एवढा रस का घेत आहेत? जाणून घ्या खरं कारण
“दाजी पोस्ट करण्याआधी माहिती घ्या”, राम कदमांना या फोटोवरून नेटकऱ्यांनी झोडपले
…अन् सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याला भावना अनावर; ‘आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले’