राम कदम आणि अर्णब गोस्वामी यांचे एवढे का जमते? काय आहे कारण?

मुंबई । सध्या राज्यात अर्णब गोस्वामी अटक प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. गोस्वामी यांच्या सुटकेसाठी भाजप आमदार राम कदम हे विविध मार्गाने प्रयत्न करत आहेत. त्यांनी आंदोलन देखील केले आहे.

राम कदम यांनी मंत्रालयाबाहेर उपोषण देखील केले आहे. त्यांनी पदयात्रा देखील काढली. महाविकास आघाडी सरकार हे राजकारण करत असल्याचे यावेळी ते म्हणाले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या सर्व घडामोडीमागे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राज्यात भाजपचे अनेक नेते आहेत. मात्र फक्त राम कदम हेच अर्णबच्या सुटकेसाठी येवढी धावपळ का करत आहेत? यामागे अजून काही कारण आहे का? त्यांचे वैयक्तीक कारण आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत या न्यूज चॅनेलवर होणाऱ्या चर्चा सत्रात राम कदम सहभागी होताना गेल्या काही दिवसात दिसले. अर्णब गोस्वामी देखील ठाकरे सरकारवर टार्गेट करत असल्याची टीका अनेकदा होत गेली. सुशांत प्रकरणात देखील मोठ्या प्रमाणात ठाकरे सरकारला टार्गेट करण्यात आले.

आक्रमक आणि वादग्रस्त भूमिका घेऊन कायम चर्चेत राहण्यासाठी अनेक नेते काही बेताल वक्तव्य करत असतात. अनेक चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन लोकांपर्यंत पोहचण्याची शैली अनेक नेत्यांनी वापरली आहे. हे राम कदम यांनीही जाणले आहे.

राम कदम नियमितपणे रिपब्लिक चॅनेलच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याने संपादकांशी चांगले संबंध असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर राम कदम टोकाच्या भूमिका घेत असण्याची शक्यता आहे. हे देखील याचे प्रमुख कारण आहे.

अनेक राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर देखील राम कदम सहभागी होऊन आपले मत मांडतात. पक्षातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी ते या गोष्टी करत असतात, असेही सांगितले जाते. भाजपची बाजू, ठाकरे सरकारची गोची करणे, आंदोलन करणे यासाठी राम कदम प्रयत्नशील असतात.

सुशांतसिंग, कंगना प्रकरण, अर्णब प्रकरण यावर आवाज उठवून राम कदम आता राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. ते अगोदर मनसेत होते तेव्हा देखील ते राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. ते तेव्हा देखील आक्रमक भूमिका घेत होते. आता ते भाजपमध्ये आहेत आणि आता देखील ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

आक्रमक भूमिका घेऊन ते पक्षातील मोठ्या नेत्यांच्या जवळ जातात. यामुळे पक्षाचा देखील फायदा होतो. मनसेत देखील ते आक्रमक भूमिका घेत होते. आणि आता भाजपमध्ये देखील घेत आहेत. स्थानिक विषय असो अथवा राष्ट्रीय विषय असो राम कदम हे आपल्या पक्षाची भूमिका परखडपणे मांडतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.