राम कदम यांनी राज कुंद्रावर केले गंभीर आरोप, म्हणाले, मॉडेलचे शारीरिक शोषण करून…

मुंबई । पॉर्न व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रा यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज नवीन खुलासे केले जात आहेत. आता भाजप नेते राम कदम यांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. कुंद्राने एका प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

यामुळे आता अटकेत असलेले राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. या पीडित मॉडेलने पोलिसात तक्रार केली तेव्हा तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असाही दावा राम कदम यांनी केला आहे. तसेच राज कुंद्राने जवळपास ३ हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असेही ते म्हणाले.

त्याने ऑनलाईन गेमची सुरुवात केली होती. या गेमचे नाव गेम ऑफ डॉट असे होते. राजने या गेमच्या नावाखाली डिस्ट्रिब्यूटर्ससोबत फ्रॉड करुन कोट्यवधी रुपये कमावले आहेत. पैसे कमावल्यानंतर त्याने सगळ्यांशी संबंध तोडले.

विशेष म्हणजे, फ्रॉड केल्यानंतर याच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा राम कदम यांनी केला. यामुळे याबाबत पुढच्या तीन दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

एका प्रसिद्ध मॉडेलने मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या मॉडेलने आपल्या तक्रारीत राज कुंद्राने शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पण ही तक्रार पुढे जाऊ शकली नाही, असेही राम कदम यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

उत्तराखंडच्या तलावात सापडले १२०० वर्ष जुने ५०० मानवी सापळे; मृत्युचे कारण ऐकून वैज्ञानिक हादरले

नर्सकडून २ महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण, बाळाचा हात फ्रॅक्चर; सीसीटीव्हीतून झाला खुलासा

कडक! महेंद्रसिंगच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.