सकाळी उठल्यावर राम गोपाल वर्मा बघतात तसल्या ॲडल्ट फिल्म; बायकोनेही दिला घटस्फोट

राम गोपाल वर्मा आज ७ एप्रिलला त्याचा ५९ वाढदिवस साजरा करत आहेत. ‘ रंगीला ‘, ‘सत्या ‘, ‘ कंपनी ‘ यांसारख्या सुपरहिट पिक्चर चे डायरेक्टर आहेत. राम गोपाल वर्मा बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांना घेऊन चर्चेत असतात. जाणून घेऊ त्यांच्या विषयीच्या अश्या काही गोष्टी ज्यांना घेऊन ते सतत चर्चेत असतात.

राम गोपाल वर्मा कधी उर्मिला मातोंडकर मुळे घटस्फोट तर कधी कधी सकाळी सकाळी उठून अडल्ट वीडियोमुळे चर्चेत असतात. सतत चर्चेत राहणारे राम गोपाल वर्मा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी याच्या सुरवातीच्या काळातील दिवाने असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते.अश्या अनेक गोष्टींमुळे राम गोपाल वर्मा सतत चर्चेचा विषय ठरत असलेले दिसून येते.

राम गोपाल वर्मा यांनी काही वर्षांपूर्वी युट्यूब चैनला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की ते रात्री कितीही उशिरा झोपले तरी सकाळी ६ वाजण्याआधी उठतात. उठल्यानंतर ते १०/१५ मिनिट अडल्ट वीडीओ बगतात. त्यांनी सांगितले की असे वीडियो नाही पहिले तर ४५ मिनिटाची डॉक्यूमेंट्री पाहतो, यामागचे कारण असे की हे वीडियो त्यांना एक्साइट करतात आणि शरीरातील केमिकल रिऐक्शन होते त्यामुळे त्यांना पूर्ण दिवस उत्साहित वाटते.

बॉलिवूडमध्ये यश आणि नावही कमावलेल्या या दिग्दर्शकाचं खासगी जीवन मात्र खूपच चर्चेत राहिलं. विवाहित असूनही एका अभिनेत्रीवर प्रेम करणं त्यांना चांगलंच महागात पडलं. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांचं अफेअर बी-टाउनमध्ये खूपच चर्चेत राहिलं होतं. राम गोपाल वर्मा यांच्यासोबत उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदा ‘सत्या’ चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर उर्मिला यांना घेऊन त्यांनी ‘रंगीला’चीही निर्मिती केली. ते उर्मिला मातोंडकारच्या प्रेमात एवढे वेडेझाले होते की त्यांनी माधुरी दीक्षित यांना पिक्चर मधून काढले होते.

राम गोपाल वर्मा यांचा ‘रंगीला’ चित्रपट उर्मिला यांच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण मानला जातो. या चित्रपटानं उर्मिला यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं.  याच चित्रपटाच्या सेटवर राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला कास्ट करण्यात येऊ लागलं आणि बॉलिवूडमध्ये सुरू असलेली या दोघांच्या अफेअरची चर्चा राम गोपाल वर्मा यांच्या घरी जाऊन पोहोचलं.

राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्या नात्याबद्दल जेव्हा त्याची पत्नी रत्नाला समजलं. तेव्हा तिच्या पायाखलची जमिनच सरकली होती. या चर्चांमुळे ती खूप रागात होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीनं उर्मिला यांच्या कानाखाली  लगावल्याची वृत्तसुद्धा प्रसारित केली होत. परंतु  उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच्या नात्याबाबत कधीच कोणताही खुलासा केला नाही. पण उर्मिला यांच्यामुळे राम गोपाल वर्मा यांना त्यांच्या पत्नीनं घटस्फोट दिला असंही बोललं जातं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.