रेल्वेचे खाजगीकरण; जे घ्यायचं ते घ्या, एक दिवस जनता तुम्हाला नक्की धडा शिकवेल

 

नवी दिल्ली | मोदी सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाकडे आपली पावले टाकली आहेत. यासाठी सरकारने १०९ रेल्वेसाठी प्रस्तावही मागवले आहेत.

या निर्णयावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी आज ट्विट करत गरिबांचा एकमेव आधार असणारी रेल्वे ही आता त्यांच्यापासून हिरावणार असून त्यासाठी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

सरकारला जे पाहिजे ते सरकारने घ्यावे पण देशातील जनता याचे चांगले उत्तर देईल असेही राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

मोदी सरकारकडून खूप दिवसांपासून यावर विचार सुरू होता. या प्रस्तावामुळे भारतीय रेल्वेत भांडवल वाढेल आणि प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल अशी आशा सरकारला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.