अरे कुठून धरून आणलंय हिला! राखी सावंत मस्तानीच्या वेशात रस्त्यावर शोधतीये आपल्या नवऱ्याला

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्शियल क्वीन राखी सावंतला चर्चेत कसे राहायचे हे चांगले माहिती आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत एका खास लूकमध्ये दिसत आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर भटकणारी राखी सावंत आपल्या नवऱ्याला म्हणजे रितेशला शोधत आहे. राखीच्या या व्हिडीओला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. सध्या या व्हिडीओला लोकांनी खुप शेअर आणि ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

राखीच्या या व्हिडीओमध्ये तिने बाजीराव मस्तानी या चित्रपटामधील मस्तानीचा गेटअप परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी हे म्हणताना दिसत आहे की मला माझ्या बाजीरावला शोधायचे आहे. उदास होऊन हताश मनाने राखी सावंत रस्त्यावर इकडे तिकडे भटकत आहे.

ती म्हणत आहे की लस पण मिळत नाहीये आणि कपड्यांचे दुकानही उघडे नाहीये, त्यामुळे मी भटकत आहे. मुंबईचे लॉकडाऊन खुलत नाहीये त्यामुळे मी वैतागले आहे. पुढे राखी सावंत म्हणते की मला खतरों के खिलाडीमध्ये जायचे होते पण मी जाऊ शकले नाही.

लग्न झालेले असूनही माझा नवरा मला भेटायला येत नाही. एक शो भेटला होता मला नच बलिये तो पण बंद होणार आहे अशी बातमी आली आहे. एक चान्स मला मिळाला होता माझ्या नवऱ्याला भेटण्याचा तो पण गेला. माहिती नाही कॅनडामध्ये बसून तो कोणता बर्फाचा गोळा खात आहे.

तुम्ही मला मीरा म्हणा किंवा मस्तानी. म पासून मीरा आणि म म पासून मस्तानी, मी माझ्या बाजीरावला शोधत आहे. लोकांनी या व्हिडीओवरून राखीला खुप ट्रोल केले आहे. काहींनी कमेंट्स केल्या आहेत की कूठून पकडून आणलंय हिला. तर काहींनी कमेंट्स केल्या आहेत की डब्बेवाला विचार करत असेल की कुठे अडकलो मी.

महत्वाच्या बातम्या
PSI सह पाच पोलिस निलंबित; निरपराध व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई
मल्लिका दिसली स्विमिंगपुलमध्ये बिकीनीवर अंघोळ करताना; व्हिडिओ पाहून चाहते पण झाले घायाळ, पहा व्हिडिओ
भररस्त्यात गोळीबार करुन डॉक्टर दाम्पत्याची हत्या; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर
अमेरिकेच्या नौसेनेच्या जहाजांमागे लागले होते युएफओ? समोर आला एक विचित्र व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.