राखी सावंतने पुर्ण सस्पेंसचा केला खेळ खंडोबा; आधीच सांगून टाकले खतरों के खिलाडीच्या विजेत्याचे नाव

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. ती अनेकदा मीडियासमोर असे काही करुन जाते, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, आताही राखी अशाच एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

राखी जेव्हा पण घराबाहेर पडते, तेव्हा ती फोटोग्राफर्ससोबत बोलते. त्यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती देताना दिसत असते. आता तिने बोलता बोलता एक अशी गोष्ट बोलली आहे, जी खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.

एका फोटोग्राफरने राखी सावंतला विचारले की खतरों के खिलाडीचे सर्व स्पर्धक भारतात परत आले, त्यावर तुम्हाला काय वाटतं. यावर राखी सावंतने बोलता बोलता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या विजेत्याचेच नाव घेतले आहे.

त्या सर्वांचे स्वागत आहे. राहूल वैद्य वेलकम, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी जिंकला ना, असे राखी सावंतने म्हटले आहे. यामुळे आता राखी सावंतने बोलता बोलता विजेत्याचे नाव तर सांगुन नाही दिले ना, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण अर्जुन विनर आहे की नाही हे तर कार्यक्रमातच कळाणार आहे.

त्यानंतर राखी म्हणते की मी केप्टाऊनला नव्हती गेली आणि त्यानंतर ती फोटोग्राफरसोबत मस्ती करायला लागले. याबाबतचे वृत्त स्पॉटबॉयने दिले आहे. राखीच्या या बोलण्यामुळे अर्जुन नक्की विनर असेल की नाही यावर चाहत्यांची चर्चा सुरु झाली.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राखी सावंतचे ड्रिम में एंट्री हे गाणे रिलिज झाले होते. तिच्या या गाण्याला तिच्या चाहत्यांनी खुप चांगला प्रतिसाद दिला आहे. राखीने आपले जबरदस्त डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: दागिन्यांच्या दुकानामध्ये महिलांचा प्रताप; अशी चोरी केली की सर्वच झाले हैराण
माणूसकीला काळिमा! नवजात मुलीचे पाय उलटे असल्यामुळे आईवडिलांनी काढला रुग्णालयातून पळ
‘गदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले, ‘आम्ही छोटे होतो म्हणून कलाकार गदर चित्रपटाला द्यायचे नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.