मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. विविध कारनामे करत ती लाइमलाइटमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. सध्या बिग बॉस १४मध्ये राखी सावंत चांगलीच धुमाकुळ घातलाना दिसत आहे.
‘शो’लाही राखीच्या लोकप्रियतेचा चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे राखी जे काही करत त्यावर जास्त विचार न करता फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले जातं आहे. त्यामुळे आयटम गर्ल राखी सावंत आता बेस्ट एंटरटेनरही बनली आहे. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात राखीने पोट मोठं असलं तर रोमान्स करायला अडचणी येतात, असा अजब दावा केला आहे.
या ‘शो’ दरम्यान राहुल वैद्यने राखीला राहुल महाजनचं धोतर खेचण्याबाबत विचारल्याचे पाहायला मिळाले. त्या प्रश्नावर राखीने राहुल महाजनची बॉडी शेमिंग म्हणजेच त्याच्या शरीरयष्टीवर भाष्य केले आहे. ती म्हणतीये, “मला राहुल महाजनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कारण त्याचं पोट मला आवडत नाही. राहुल महाजनकडे अभिनाव सारखे अॅप्स नाहीत”.
दरम्यान, राखीच्या या वक्तव्यावर राहुलने विचारले की, “जर कुणाला अॅप्स नाहीत तर त्याला जगण्याचा अधिकार नाही?”राहुलच्या या सवालावर राखी म्हणतीये, “कोणतीही महिला मोठं पोट असलेल्या माणसासोबत रोमान्स करु शकत नाही”, तिच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गजानन मारणेसाठी धडकी भरवणारी बातमी! पुण्यातील साम्राज्य उद्धवस्त करण्याची पोलीस आयुक्तांची घोषणा
सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…