राखीचा काही नेम नाही! आमदाराला म्हणाली, माझे नाव घेतले तर मी तुमचा चड्ढा उतरवेन

आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी राखी सावंतशी पंगा घेतला आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिद्धू यांची राखी सावंतशी तुलना केली. हे कळताच राखी सावंत भडकली आणि आता ती राघव चढ्ढा यांच्यावर खुप रागावली असल्याचे दिसत आहे.

राखी सावंतने या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि राघव चड्ढा यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. रागावलेली राखी सावंत स्पष्टपणे म्हणाली की राघव चड्ढा माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. जो कोणी मिस्टर चड्ढा असेल जर परत माझे नाव घेतले तर मी तुझा चड्ढा उतरवेन.

राखी सावंत तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते आणि ती कोणालाही सोडत नाही, ती कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल हे कोणालाही माहिती नसते. आणि आता, राघव चड्ढा यांनी ज्या प्रकारे तिचे नाव वापरले आहे, त्यांनी किंवा कोणीही राखीकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा केली नसेल.

शुक्रवारी आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिद्धू यांना पंजाबच्या राजकारणाची ‘राखी सावंत’ म्हणून संबोधले होते. अरविंद केजरीवाल यांच्याबाबत सिद्धू यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सिद्धू म्हणाले होते की, ‘जेथे एमएसपी जाहीर केली जाते, तिथेही शेतकऱ्यांचे शोषण होते आणि पिकांचे भाव कमी होतात. अरविंद केजरीवाल जी, तुम्ही खाजगी बाजाराचा केंद्रीय काळा कायदा अधिसूचित केला आहे. ते डी-अधिसूचित केले गेले आहे की अजूनही कारणं देत आहात?

राघव चड्ढा यांच्या ‘पंजाब राजकारणाची राखी सावंत’ या विधानावर सिद्धू यांनी ट्वीट केले होते की, माणूस वानरांपासून विकसित झाला आहे आणि तुम्हाला पाहून माझा विश्वास आहे की तूम्ही अजूनही वानरांपासून विकसित होत आहात. तुमच्या सरकारच्या वतीने कृषी कायदे अधिसूचित करण्याच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अद्याप दिले नाही.

महत्वाच्या बातम्या
टिम इंडीयात उभी फूट! विराटच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतप्त खेळाडूंची थेट जय शहांकडे तक्रार
फोनवर बोलण्यासाठी बाईक थांबवली अन् घात झाला; क्षणात होत्याचे नव्हते झाले! सांगा चूकी कुणाची?
खाणीत काम करताना मजुराला भेटला तब्बल ४० लाखांचा हिरा, एका रात्रीत झाला लखपती
शास्त्रींच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक?; वेगळेच नाव आले आघाडीवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.