‘खतरों के खिलाडी ११’ ची राखीने केली भविष्यवाणी; सांगितले कोण आहे या सीझनचा विनर?

लवकरच आपल्या सगळ्यांना ‘फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी सीझन ११ ‘ पाहायला मिळणार आहे. हा छोट्या पडद्यावरील एक चांगला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम लवकरच टीव्हीवर येणार आहे. यावेळी हा शो बर्‍याच चर्चेत आहे आणि या शोचे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनला रवाना झाले आहेत.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, शो अद्याप सुरू झाला नाही परंतु त्यापूर्वी राखी सावंतने या शोच्या विजेताचा अंदाज वर्तविला आहे. सर्व प्रथम, आपण हे पाहूया की आतापर्यंत उघड झालेल्या या यादीमध्ये खतरों के खिलाडी ११ मध्ये अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, निक्की तांबोळी, वरुण सूद, श्वेता तिवारी आणि अर्जुन बिजलानी यांचा समावेश आहे.

राखी म्हणाली की अभिनव हे विजेतेपद जिंकू शकतो. ती म्हणते, ‘अभिनव शुक्ला खूप मजबूत स्पर्धक आहे, मला वाटतं अभिनव शुक्ला विजयी होतील. दिव्यंका त्रिपाठी यावर्षीच्या त्यांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक असल्याचेही तिने सांगितले.

राहुल वैद्यने सहभाग घेतल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. ती म्हणते, समोर येऊन पंच मारण्यासाठी विंदू दारा सिंगला घ्यायला हवे होते. राहुल वैद्य तिकडे का गेले मला माहिती नाही. त्याच्या पाठदुखीची खूप समस्या आहे. पण राहुल वैद्य यांच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन.

मुलाखती दरम्यान राखीनेही एक अतिशय विचित्र दावा केला होता. तिने दावा केला की रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’ चे मुख्य पात्र मोगली आणि एडगर राईस बुरोचे काल्पनिक पात्र टार्झन हे त्यांचे पूर्वज होते.ती म्हणते, ‘मला कुणाचीही भीती वाटत नाही.

मी सिंह, साप गिळंते. उंदीर आणि विंचू याचं मला काहीच वाटत नाही. माझे पूर्वज कोण आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे काय? आपण मोगली बद्दल ऐकले आहे का? टार्झन आणि मोगली? ते माझे पूर्वज होते. राखीच्या या बोलण्याने चाहते मात्र विचारात पडले आहे.

हे ही वाचा –

रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त

लाडकी लेक जीजासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारेचे भन्नाट नृत्य, लेकीनेही धरलाय ठेका

मेरे सैंया सुपरस्टार गाण्यावर डान्स केलेल्या त्या नवरीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.