पाच दिवसानंतर वाघ परतला; नक्षलवाद्यांकडून ‘त्या’ कोब्रा कमांडोची सुटका

 

 

३ एप्रिलला छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता, त्यामध्ये २२ जवान शहीद झाले होते, त्यात कोब्रा टीमचे कंमाडो राकेश्वर सिंग यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.

आता त्याच कमांडोची सुटका करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जरी केले होते, की ३ एप्रिलमध्ये झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेला जवान आमच्या ताब्यात आहे.

तसेच सरकारने मध्यस्थी केल्यास त्याची सुटका करण्यात येईल, असे नक्षलवाद्यांनी म्हटले होते, आता राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर नक्षलवाद्यांनी कमांडोची सुटका केली आहे. सध्या ते तर्रेममध्ये १६८ व्या बटालियन कँपमध्ये आहेत. तिथे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे.

दरम्यान, बुधवारी नक्षलवाद्यांनी एक पत्र पाठवले असून त्यामध्ये कमांडो पुर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले होते. तसेच नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर यांचा एक फोटो सुद्धा शेअर केला होता, त्यामध्ये ते एका झोपडीत बसल्याचे दिसून येत असून ते पुर्ण सुरक्षित असल्याचे दिसत होते.

नक्षलवाद्यांनी हे पत्र बीजापूरचे पत्रकार गणेश मिश्र यांना पाठवले होते, तसेच जवानाला सोडण्यासाठी काही अटीही ठेवल्या होत्या. आपल्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने मध्यस्थांना पाठवावे, तेव्हाच राकेश्वर यांची सुटका केली जाईल, असे नक्षलवाद्यांनी म्हटले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.