Share

अग्निपथ योजनेविरोधात राकैश टिकैत यांनी थोपटले दंड, ४ लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत दाखल होणार

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. विरोधी पक्षांनी ‘अग्निपथ’ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने काल दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी सत्याग्रह करत केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शवला आहे.(rakesh tikait protest against agnipath scheme)

यादरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत(Rakesh Tikait) यांनी देखील अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत यांनी अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राकेश टीकेत यांनी ही घोषणा केली आहे.

अग्निपथ योजनेला विरोध दर्शवताना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत म्हणाले की, “केंद्र सरकारची ही योजना थांबविण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. भारताला शेतकरी आंदोलनाप्रमाणे आणखी एका मोठया आंदोलनाची आवश्यकता आहे”, असे राकेश टीकेत यांनी सांगितले आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत पुढे म्हणाले की, “आतापर्यंत सैन्यात भरती झालेल्या तरुणांना किमान १५ वर्षे नोकरी आणि निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळत होती. पण आता अग्निपथ योजना लागू झाली तर तरुणांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही. असाच कायदा आमदार-खासदार यांच्या निवडणूकीसाठी करावा, अशी मागणी राकेश टीकेत यांनी केली आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत म्हणाले की, “आमदार-खासदार वयाच्या ९० वर्षांपर्यंत निवडणूक लढवत आहेत. त्यांना पेन्शनही मिळते. पण अग्निपथ योजनेमुळे तरुणांना फक्त चारच वर्ष सैन्य दलात सेवा बजावता येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर सेवानिवृत्ती लादली जाणार आहे. हे अन्यायकारक आहे. आम्ही या योजनेचा विरोध करत आहोत. भारतीय किसान युनियन याविरोधात मोठं आंदोलन करेल.”

“चार लाख ट्रॅक्टर तयार आहेत. या योजनेच्या विरोधात एका शेतकरी आंदोलनाप्रमाणे एका मोठया आंदोलनाची आवश्यकता आहे”, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत यांनी सांगितले आहे. राकेश टीकेत यांच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक बैठक देखील घेतली आहे. या बैठकीत दिल्लीच्या सर्व सीमा सुरक्षांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काँग्रेसने विंनती केल्यानंतर मतांचा कोटा बदलला
फक्त पाच दिवस सोनं स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णयोग, सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री झाली सुरू
यावेळी तुम्हाला मला मतदान करावंच लागेल नाहीतर…, खडसेंचे भाजप आमदारांना साकडे

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now