‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा…; राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे.

“शेती कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर आम्ही पुढची योजना तयार करू. आम्ही सरकारसोबत दबावाखाली चर्चा करू शकत नाही,” असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

ते आज चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘सरकारने कायदे मागे घ्यावेत, एमएमसपीवर कायदा करावा. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशभर प्रवास करू. आमचे अराजकीय आंदोलन संपूर्ण देशात होईल. मग असे म्हणून नका, की हे कसे आंदोलन आहे, असेही टिकैत म्हणाले.

देशात ‘टिकैत फॉर्मूला’ लागू करा…
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असे टिकैत यांनी म्हटले आहे. तसेच ३ क्विंटल (३०० किलो) गव्हाची किंमत ही १ तोळा सोन्याएवढी करायला हवी, यासोबतच देशात “टिकैत फॉर्मूला” लागू करा, असेही त्यांनी म्हंटले.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंधू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचे केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनले आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आले आहे. अशातच टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा; वाचून तुम्हाला वाटेल कौतुक
शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला; “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…”
सचिनकडून भारतरत्न सन्मानाचा अपमान; पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडून टिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.