देशात ‘टिकैत फॉर्मूला’ लागू करा; शेतकरी नेत्याच्या ‘या’ मागणीने मोदी सरकारला फुटला घाम..

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपक्षाही जास्त दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.

अशातच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठे विधान केले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असे टिकैत यांनी म्हटले आहे. तसेच ३ क्विंटल (३०० किलो) गव्हाची किंमत ही १ तोळा सोन्याएवढी करायला हवी, यासोबतच देशात “टिकैत फॉर्मूला” लागू करा, असेही त्यांनी म्हंटले.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंधू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचे केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनले आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आले आहे. अशातच टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

शेतकऱ्यांचा आज देशभर ‘चक्का जाम’…
आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आले असून, देशभरात तीन तास आंदोलन केले जाणार आहे. याबद्दल कृषी संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी माहिती दिली

महत्त्वाच्या बातम्या
“त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?”; अजित पवारांचा सेलिब्रिटींना सवाल
‘आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?’
धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटा आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.