कोरोनाची तिसरी लाट भारतात येणारच नाही, पैज लावून सांगतो; भारताच्या वाॅरन बफेटची भविष्यवाणी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, पण आता दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. असे असताना आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहे.

अशात गुंतवणूक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आणि दलाल स्ट्रीटचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी खुप वेगळं मत व्यक्त केले आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे मत झुनझुनवाला यांनी व्यक्त केले आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी सीएनबी टिव्हीला एक मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटविषयी भाष्य केले आहे. मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे, की भारतामध्ये इतक्यात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

कोणीही दोन लाटांचे भाकीत व्यक्त केल नव्हतं, पण आता सगळेचजण तिसऱ्या लाटेचे भविष्यवाणी व्यक्त करताना दिसत आहे. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे. ते पाहता आपल्या सर्वांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल. त्यामुळेच तिसरी लाट येण्याची शक्यता मला वाटत नाही, असे झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाची तिसरी लाट आली तरी त्या तिसऱ्या लाटेचा अर्थ व्यवस्थेवर फारसा परीणाम होणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच काही बदलांबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

सोशल नेटवर्किंग साईटच्या सर्वच लोकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत आहे, त्यामुळे आपण घाबरुन गेलो आहोत. आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. पण मला वाटत नाही, की तिसरी लाट येईल, असे झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सकाळी तक्रार आणि संध्याकाळी निर्णय, अजितदादांनी एकाच दिवसात मिळवून दिला न्याय..
तारक मेहतामधील दयाबेनने केले होते बी-ग्रेड चित्रपटात काम; बोल्डनेसची सर्वच हद्द केली होती पार
सलमान खानला अभिनेता नाही तर क्रिकेटर बनवणार होते सलीम खान पण….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.