राकेश झुनझुनवालांनी मोदींची तुलना केली बायकोशी, म्हणाले सुहागरात्रीला..; व्हिडीओ तुफान व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीय शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधानांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका होत आहे. खरं तर, आज तकच्या कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आले की, त्यांनी तुम्हाला का आमंत्रित केले होते? आम्ही तुम्हाला विचारणार नाही.

त्यांनी तुम्हाला काय सांगितले आणि तुम्ही त्यांना काय सांगितले? असा प्रश्न झुनझुनवाला यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर राकेश झुनझुनवाला म्हणाले, सुहागरातमध्ये पत्नीसोबत काय संवाद झाला होता ही काय सांगण्याची गोष्ट आहे का? त्याचे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसायला लागले.

मात्र, कार्यक्रमाची ही क्लिप सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्यावर आता टीका केली जात आहे. काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही व्हिडिओ क्लिप ट्विट केली आणि लिहीले की, ये रिश्ता क्या कहलाता है?

प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल दीत म्हणाले, एक स्टॉक ब्रोकर 1.5 अब्ज लोकसंख्या असलेल्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांच्या भेटीची तुलना त्याच्या हनिमूनशी करतो. डंकाधिपतीजींच्या राजवटीत पंतप्रधानपदाची अशी अवस्था झाली आहे, असे ते म्हणाले.

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनीही आपल्या ट्वीटमध्ये लिहीले आहे की, खरोखर हे लज्जास्पद आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही राकेश झुनझुनवाला यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट केले, ‘भारताच्या पंतप्रधानांची प्रतिष्ठा इतकी कमी होईल.

कधीही विचार केला नव्हता की शेअर बाजारातील दलाल पंतप्रधानांची तुलना त्यांच्या हनीमूनवाल्या पत्नीशी करेल. जर तुम्ही पेटीएम ची जाहिरात कराल तर असंच होणार मोदीजी. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी ट्विट केले की, ‘राकेश झुनझुनवाला यांचे शब्द अतिशय लाजिरवाणे आहेत, पंतप्रधानांची त्यांच्या पत्नीशी तुलना करणे आणि बैठकीची हनीमूनशी तुलना करणए हे अत्यंत दुर्दैवी आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही बिग बुल असो किंवा बिग बॉस, तुम्ही पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची काळजी घ्यायला हवी होती, असे ट्वीट त्यांनी केले आहे. अनेक नेत्यांनी आणि लोकांनी राकेश झुनझुनवाला यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यांची क्लिप सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या
‘या’ भीतीमुळे आईने कादर खानला काबुलहून मुंबईत आणले, गरिबी इतकी की मशिदीसमोर मागायचे भीक 
ब्रेकिंग! आर्यनचा खोटारडेपणा आला समोर; चौकशीत अनन्या म्हणाली, आर्यनला गांजा ओढताना पाहिलय
घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने पूर्ण केले तिचे स्वर्गात जाण्याचे स्वप्न, सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती
बारामतीच्या मोरे बंधूच्या हलगीवर चक्क मायकल जॅक्सनही थिरकला होता; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.