राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. (raju shetty tweet criticize sanjay raut)
राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. स्वाभिमानी पक्षाच्या आमदारासह काही आमदारांची मते आम्हाला मिळाली नाहीत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांचा रोख अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे होता. पण प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत स्वाभिमानी पक्षाचे आमदार असे म्हणाले. यावरून स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
त्या पोस्टमध्ये स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांनी लिहिले आहे की, “संजय राऊतजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून केलेला आहात त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हाकालपट्टी केलेली आहे. तेंव्हा कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका. तो असा का वागला? या प्रश्नाच उत्तर तुम्हाला अजित पवार व जयंत पाटील देतील.”
https://www.facebook.com/100044342623536/posts/pfbid031rDJnxFeZQQ25ijii4kWjZ5JQQdo4YqFfAih1Lv5W6KgSNRqtvR3uvZJjQTzzV5Ml/?d=n
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “संजय राऊत ब्रम्हदेव आहेत का हे समजत नाही. मतदान हे गोपनिय असते. आम्ही त्यांना मत दिले नाही हे त्यांना कसे कळले. ज्यावेळी महाविकास आघाडी झाली त्यावेळी शिवसेना नंतर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे कोणी मतदान दिले नाही असे सांगण्याचा अधिकार शिवसेना नेते संजय राऊत यांना नाही”, असे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.
“मी पहिल्या दिवसापासून दगाफटका केलेला नाही. माझ्या मतदार संघातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री कमी पडले, अशी खंत मी बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री कुटूंब प्रमुख आहेत. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगायच्या नाहीत तर मग दाऊद इब्राहिमला सांगायच्या का?”, असा सवाल अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेचा उमेदवार पराभूत होताच संभाजीराजे समर्थकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, राऊत आता कसं वाटतंय…
“प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचे की दाऊद इब्राहिमसमोर?”, घोडेबाजारच्या आरोपांवर अपक्ष आमदाराचा राऊतांना सवाल
आमचे देवेंद्रजी आहेतच तसे! महाडिक जिंकताच चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांचं केलं तोंडभरून कौतुक