Raju Shetti on Devendra Fadnavis: सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा (Valva) तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) गावात हर्षल पाटील (Harshal Patil) या ३५ वर्षांच्या सरकारी ठेकेदाराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत झालेल्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या हर्षल यांनी गळफास घेतला. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“तुमच्या कर्माची फळ जनता भोगतेय”
राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनंतर आता ठेकेदार आत्महत्या करत आहेत. हे तुमच्या अपयशी कारभाराचे फळ आहे. हर्षल पाटील यांच्यासारखा तरुण, ज्याला पाच वर्षांची मुलगी आहे, त्याने आत्महत्या केली याची जबाबदारी कोण घेणार?’’
शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे कंत्राटदारांना महिन्योनमहिने बिलं न मिळाल्याने त्यांची कुटुंबं उध्वस्त होतात आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गसाठी हुडकोकडून २० हजार कोटी कर्ज काढून ८६ हजार कोटींचा प्रकल्प करण्याचा अट्टाहास का?’’
“कुंकू पुसण्याचे पाप सरकारच्या धोरणामुळे”
शेट्टींचा आरोप होता की, ‘‘सामान्य जनतेची बिले थकीत आहेत. अनेक ठेकेदार वर्षानुवर्षे पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. तुमचे आमदार-खासदार टक्केवारी घेत मदमस्त आहेत. एक बाप, एक पती म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या हर्षल पाटील यांची पत्नी आता कपाळावरचं कुंकू पुसतेय, याला कोण जबाबदार? हे पाप तुमच्या धोरणांचं आहे.’’
सरकारला राजू शेट्टींचा इशारा
राजू शेट्टी यांनी सांगितले की, सरकारने आता तरी सद्सबुद्धी ठेवून निर्णय घ्यावेत. सार्वजनिक कामं करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे त्वरीत द्यावेत. अन्यथा हे आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही, अशी इशारावजा टीका त्यांनी केली.