स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी याबाबत घोषणा केली आहे. देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा करताना राजू शेट्टी भावुक झाले होते.(raju shetty extrusion mla devendra bhuyar amaravati)
गेल्या अनेक दिवसांपासून आमदार देवेंद्र भुयार यांच्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे अनेक तक्रारी येत होत्या. पक्षाच्या कार्यक्रमांना देखील आमदार देवेंद्र भुयार उपस्थित राहत नव्हते. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मोर्शी वरुड मतदारसंघातील लोक देखील त्यांच्यावर नाराज होते.
अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी हिवरखेड येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. यावेळी राजू शेट्टी भावुक झाले होते. ‘मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दुःख वाटतं. मी माझे घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले”, असे राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर टीका देखील केली. राजू शेट्टी भाषणात म्हणाले की, ” देवेंद्र भुयार यांच्याबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण माझ्या संघटनेत राहू शकत नाही. आजपासून देवेंद्र भुयार यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.”
देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. निवडणून आल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी केली होती. मंत्रिपदासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी राजू शेट्टी यांच्याकडे सारखाच तगादा लावला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यात वेगवेगळ्या विषयांवरून खटके उडत होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील आमदार देवेंद्र भुयार यांच्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या हाकालपट्टीवर आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
तुम्हाला वाटतय कश्मीर फाईल्स लोकांनी पहावा तर युट्यूबवर टाका, लोकांना फूकट पाहता येईल
नात्याला काळीमा फासणारी घटना! फिरायला चल असं सांगून गर्भवती पत्नीला बाहेर नेलं अन्.., वाचून हादराल
‘या’ आहेत जगातील ५ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, फोटो पाहून लागेल वेड