‘गोकुळचा संचालक व्हायचं असेल तर १० लिटर दूध न दमता काढून दाखवा’

मुंबई : ‘गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे असं वाटत असेल तर सर्वच इच्छुकांना एक अट घातली पाहिजे. ती अट अशी पाहिजे की इच्छुकांनी न थकता किमान १० लीटर दूध काढून दाखवावे,’ असे चॅलेंज माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे.

ते म्हणाले, ‘ज्यांना गोकुळची निवडणूक लढवायची आहे, त्यात भाग घ्यायचा आहे, त्यांनी न दमता किमान १० लिटर दूध काढून दाखवावे अशी एक अट घालावी अशी मागणी शेट्टी यांनी केली.

अशी जर अट घातली तरच गोकुळ हा दूध संघ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा राहिला असेही शेट्टी म्हणाले. या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील बड्या राजकीय नेत्यांची मुलं रिंगणात उतरली आहेत. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी हा खोचक टोला लगावला.

दरम्यान, सध्या गोकुळ दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, यंदा पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावायचे ठरवले आहे. त्यासाठी सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या निवडणुकीच्या वेळी थोडक्यात हुकलेली सत्ता यावेळी कोणत्याही परिस्थितीत मिळवायचीच असा चंगच सतेज पाटील यांनी बांधला आहे. त्यामुळे गोकुळच्या या राजकीय कुस्तीत आता रंग भरायला सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

काय सांगता! रोहित शर्माच्या मुलीने हेल्मेट घालून मारला सिक्सर; व्हिडीओ होतोय व्हायरल

“…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंनी दिला राज्यातील जनतेला इशारा

“सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.