“प्रशांत भूषण यांनी आपल्या मनातील प्रश्नांना वाचा फोडलीय, त्यांच्या पाठीशी निर्भयपणे उभे रहा”

मुंबई | ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे न्यायालय अपमान प्रकरणात दोषी आढळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर सुनावणी सुरू केली आहे. याबाबत प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

आता या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपले मत मांडले आहे.

प्रशांत भूषण यांच्या भूमिकेमागे मागे सगळ्याच न्यायप्रिय लोकांनी उभे राहिले पाहिजे. त्यांनी आपल्या मनातील प्रश्नांनाच वाचा फोडलेली आहे, असे राजू शेट्टींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्याय व्यवस्था आणि प्रसार माध्यमे ही दोन स्तंभ सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. माध्यमापैकी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी तर राज्यकर्त्यांची भाटगीरी करण्यातच धन्यता मानली आहे. पण मला आश्चर्य वाटते ते न्यायव्यवस्थेचे न्यायालय हे आमचा शेवटचा आशेचा किरण होता. त्यावरचाही विश्वास आता डळमळीत झाल्यासारखे वाटू लागल्याचं राजू शेट्टींनी पोस्टमध्ये आहे.

प्रशांत भूषण यांनी न्यायव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करणारे ट्विट केल्यावर सर्वोच्च न्यायालय खडबडून जागे झाले. भूषण यांनी 8-9 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे बरेचसे न्यायमूर्ती भ्रष्टाचारी आहेत, असे वक्तव्य केल्याची अपमान याचिका प्रलंबित असताना तातडीने सुनावणीसाठी घेतली गेली.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती 2 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्याच्याआधी या दोन्ही दाव्याचा निकाल लावण्याचा हेतू दिसत आहे. तसा त्यांनी गर्भित इशारा देखील प्रशांत भूषण यांना दिलेला आहे.

महत्वाच्या बातम्या-

डॉक्टरांची सीबीआयकडे कबुली; मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी घाई केली, त्यामुळे.. 

-‘या’ प्राण्यांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका! अखेर शास्रज्ञांनी शोधून काढलेच..

-अनलॉक ४; १ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात ‘या’ सर्व गोष्टी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.