मुंबई | केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या दिड महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी केंद्रसरकारसोबत चर्चा करूनही यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे कडाक्याच्या थंडीतही शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फैलावर घेतले. “कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?”, असा सवाल करत कोर्टाने केंद्र सरकारला झापले आहे.
याचाच धागा पकडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘केंद्र सरकार शेतकरी आंदोलनबाबात नाटक करत आहे. टाईमपास करत आहे,’ सुप्रीम कोर्टाने हे सगळं ओळखून केंद्र सरकारला झापले असल्याचे शेट्टींना सांगितले.
दरम्यान, ‘या शेतकरी आंदोलनात ५५ शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे, तरीसुद्धता या सरकारला जाग आली नाही,’ असे शेट्टी यांनी म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलाव…
आज सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फैलावर घेतले. “कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?”, असा सवाल करत कोर्टाने केंद्र सरकारला झापले आहे.
“केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन ज्यापद्धतीने हाताळत आहे, त्यावर आम्ही नाखूश आहोत. तुम्ही कायदा संमत करण्याआधी काय केलं? ते आम्हाला माहीत नाही. मागील सुनावणीवेळीही चर्चा सुरू आहे असेच सांगण्यात आले. पण त्यापुढे काही झालेलं दिसत नाही”, असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले.
याचबरोबर कृषी कायद्यांना स्थगिती द्या आणि समिती नेमा असा प्रस्ताव केंद्राला न्यायालयाने दिला आहे. सरकारनं या कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती द्यावी, अन्यथा आम्हीच कायद्यांना स्थगिती देऊ, असे न्यायालयाले केंद्राला सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप; थेट निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
‘सीरम इंस्टिट्यूट’ला मिळाली केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर; किंमतही केली जाहीर
‘विरुष्का’च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन; विराटने दिली आनंदाची बातमी